एवढी आहे शाहरुख खानच्या शुजची किंमत

shoe
नुकतीच लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ लॉने बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानला मानद् पदवी बहाल केली. किंग खान खास याचसाठी लंडनला गेला होता. त्यानंतर तो मायदेशात परतला असून ५३ वर्षांच्या या बादशहाला त्याच्या कामासाठी आणि असिड अटॅक पिडीतांसाठी मीर ही त्याची संस्था जे काम करते त्यासाठी त्याला मानद् पदवी देण्यात आली.
shoe1
शाहरुखने भारतात परतताना कम्फर्टेबल कपडे घालण्यालाच प्राधान्य दिले. पांढऱ्या टीशर्टवर त्याने जॅकेट घातले होते तर काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातली होती. यावेळी उपस्थितांचे लक्ष त्याच्या कपड्यांवर नाही तर शाहरुखच्या शूजकडेच जास्त गेले. या शूजची किमान किंमत ३० हजार ते ५० हजार असावी असे म्हटलं जाते आहे. पांढऱ्या रंगाच्या या शूजवर काळ्या रंगाचा एक स्टार आहे. शाहरुखकडे या ब्रँडचे आणि याचप्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे अजूनही शूज आहेत.

Leave a Comment