मारुतीने थांबवला ‘किडनॅपिंग कार’चा प्रवास

omani
ज्या गाडीला 19 च्या दशकात चित्रपटामधून ‘किडनॅपिंग कार’ म्हणून ओळख मिळाली अखेरच तिचा प्रवास आता थांबला असून ओमनी कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय मारूती सुझुकीने घेतला आहे. त्यामुळे रस्त्यावर गेल्या 35 वर्षांपासून धावणारी ओमनी कार आता हद्दपार होणार आहे.
omani1
ओमनी कार बंद करण्याचा निर्णय मारुती सुझकीने जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या कारची आताही विक्री चांगल्याप्रकारे सुरू होती. तरीही कंपनीने ओमनीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा भारतात मारूतीने उद्योगाला सुरुवात केली होती. तेव्हा सुरुवातील मारुती 800 ही कार लाँच केली होती. त्यानंतर ओमनी 1984मध्ये लाँच करण्यात आली होती.
omani2
4 ते 5 लोक मारुती 800 मध्ये सहज बसू शकत होती. परंतु, एखाद्या कुटुंबातील जास्त सदस्य असतील तर त्यांच्यासाठी फॅमिली कार म्हणून ओमनी लाँच करण्यात आली होती. त्यामुळे ओमनी अल्पावधीतच भारतीयांच्या पसंतीत उतरली. त्याचबरोबर ओमनीमध्ये जास्त जागा उपलब्ध असल्यामुळे छोटे व्यापारी सामनाची ने आण करण्यासाठीही या कारचा वापर करत होते. तसेच काही जण तर या कारचा चालते फिरते दुकान म्हणूनही वापर करत होते.
omani3
चित्रपटांमध्ये कुणाचेही अपहरण करण्याची सीन जर आला तर तिथे ओमनी ही गाडी सहज पाहण्यास मिळत होती. त्यामुळे ओमनीला किडनॅपिंग कार म्हणून वेगळी ओळखही मिळाली होती. मारूती सुझकीने काही वर्षांपूर्वी इको ही कार लाँच केली होती. इको ही ओमनीच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली. या दोन्ही गाड्यांमध्ये फक्त डिझाईनचा तेवढा फरक होता. इको या कारचे नवे सुधारीत मॉडेल लाँच करण्याची तयारी आता मारूती सुझकीने केली आहे. त्यामुळे ओमनीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment