बालवीरमधील भयंकर परीचा भयंकर लुक पाहून भडकले नेटकरी

shama-sikander
सब टीव्हीवरील ‘बालवीर’ या मालिकेत ‘भंयकर परी’ची भूमिका साकारुन प्रसिद्धीच्या झोत्यात आलेली शमा सिकंदरचे काही हॉट फोटो समोर आले असून शमा या फोटोजमध्ये मेटॅलिक गोल्डन कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. हे फोटोज तिने आपल्या इंस्टाग्रामवरही शेअर केले आहेत. यूजर्स फोटोज पाहून विचित्र विचित्र कमेंट करत आहेत. एक जण म्हणाला, तू मुसलमान आहे, थोडी तरी लाज बाळग’. एकाने लिहिले, तुझे नाव मुस्लिम आहे. थोडी तर लाज वाटू दे नाहीतर तुझे नाव बदल.


शमा काही वर्षांपूर्वी बायपोलर डिसऑर्डरने (एक प्रकारचा मानसिक आजार) ग्रस्त होती. शमानुसार, या आजाराने त्रस्त होऊन तिने एकदा आत्महत्या करण्याचादेखील प्रयत्न केला होता. एका वर्तमान पत्राने दिलेल्या माहितीनुसार तिने एका रात्री आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या आईला किस करून गुड नाइट म्हणाली आणि मला सकाळी उठवू नको. यानंतर शमाने झोपेच्या गोळ्या घेतल्या. तिने झोपण्याआधी तिच्या भावाला बँक अकाउंट डिटेल्स सांगितल्या, ज्यामुळे तो हैरान झाला. लगेच भावाने आईला कॉल केला आणि म्हणाला की, जाऊन शमाला बघ. मात्र, शमा आता या आजारातून बरी झाली आहे. आता ती फिट राहण्यासाठी रेग्यूलर एक्सरसाइज करते.

Leave a Comment