मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील बी-टाऊनमध्ये लग्नाचा धुमधडाक होण्याची शक्यता आहे. कारण आम्ही आज ज्या जोडप्यांची माहिती तुम्हाला देणार आहोत त्यांची चर्चा सोशल मीडियापासून वर्तमानपत्राची रकाने भरण्याचे काम करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या जोड्या…
सध्या बॉलिवूडमध्ये आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची तुफान चर्चा आहे. त्यांचे नाते या दोघांच्याही फॅमिलीला मान्य असून ते लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील असे म्हटले जात आहे. रणबीरचे वडील ऋषी कपूर लवकरच भारतात परतणार असून ते त्यानंतर रणबीर आलियाच्या लग्नाची बोलणी करणार आहेत. आलियाने नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात सर्वांसमोर रणबीरला ‘आय लव्ह यू’ म्हणत प्रेमाची जाहीर कबूली दिली होती.
मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले दुसरे कपल असून मीडिया रिपोर्टनुसार येत्या 19 एप्रिलला मलाइका आणि अर्जुन लग्न करणार आहेत. फक्त घरातील काही जवळच्या व्यक्ती आणि मित्रमंडळी या लग्नात उपस्थित राहतील असेही म्हटले जात आहे. पण मलाइका किंवा अर्जुनकडून याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सध्या सोशल मीडियात अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या रिलेशनशीपचीच चर्चा जास्त आहे. अनेक कार्यक्रमात हे दोघेही एकत्र दिसतात. त्यामुळे सध्या शिबानी आणि फरहान यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. असे म्हटले जाते की, हे दोघेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील. 2017मध्ये पहिली पत्नी अधुनाला फरहानने घटस्फोट दिला.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता अरबाज खान आणि विदेशी मॉडेल जॉर्जिया अँड्रियानी एकमेकांना डेट करत असून ते दोघे अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. अरबाजने 2 वर्षांपूर्वी पत्नी मलाइकाला घटस्फोट दिला आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात जॉर्जिया आली. जॉर्जिया आणि खान कुटुंबाचे संबंध खूप चांगले असून हे दोघेही यंदा लग्न करतील असा अंदाज आहे.
साऊथ आफ्रिकन मॉडेल गॅबरीला डेमेट्रिएडसला अभिनेता अर्जुन रामपाल डेट करत असून हे दोघे अनेकदा सुट्टी एकत्र एंजॉय करताना दिसतात. अर्जुन रामपालने याआधी मेहर जेसियाशी 1998 मध्ये लग्न केले होते पण मेहर आणि अर्जुन लग्नाच्या 20 वर्षांनंतर वेगळे झाले. त्यानंतर आता अर्जुन लवकरच गॅबरीला सोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.