लग्नानंतर मी धर्मांतर केले नाही, मी आजही हिंदूच आहे – उर्मिला मातोंडकर

urmila-matondkar
मुंबई : नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश करुन उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिला धर्मावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना उर्मिला म्हणाली की, जरी माझा नवरा मुस्लिम असला तरी मी माझा धर्म बदलेला नाही, मी आजही हिंदूच आहे. आगामी निवडणुकीच्या प्रचाराला तिने सुरुवात केल्यानंतर तिचा नवरा मुस्लीम असल्यामुळे तिने धर्म बदलला असल्याच्या अफवा काही लोकांनी पसरवणे सुरु केले आहे. यावर उत्तर देताना लग्नानंतर धर्म बदलला नसल्याचे उर्मिलाने स्पष्ट केले आहे.

उर्मिला म्हणाली की, जरी माझा माझा नवरा मुस्लीम असला तरी मी तितकीच एक गौरवशाली हिंदू आहे. कधीही मी धर्म नाही बदलला. हिच आपल्या देशाची सुंदरता आहे. मला ट्रोल करणारे लोक इस्लामला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. तिने यासंदर्भातील माहिती इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

ट्रोलर्सना उत्तर देताना उर्मिला म्हणाली की, पाच वर्षात केलेल्या विकासकामांबद्दल माझे विरोधक बोलत नाहीत. विकासावर बोलण्याऐवजी हे लोक मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना वाटते की एक ग्लॅमर डॉल राजकारणात आली आहे. मी त्यांच्याविषयी बोलण्यापेक्षा माझ्या कामाद्वारे उत्तर देईन. तीन वर्षांपूर्वी उर्मिलाने काश्मीरमधील व्यावसायिक आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरसोबत लगीनगाठ बांधली. मोहसिन हा उर्मिलापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

Leave a Comment