44 वर्षीय चंद्रपॉलने टी-20त अवघ्या 76 चेंडूत झळकवले द्विशतक

chadrapaul
नवी दिल्ली – क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ मानला जातो. या खेळात कधी काय होईल याचा काही नेम नाही. त्याला आताच्या घडीला क्रिकेटचे बदलेले स्वरुप कारणीभूत आहे. सध्याच्या टी-20 सामन्याचा जोर दिसत आहे. टी-20मध्ये एखाद्या संघाने 200 धावा केल्या तर त्या काही नवीन नाही. पण एखाद्या खेळाडूने टी-20त द्विशतक झळकवले तर तो मोठा भीमपराक्रम होईल. याआधीही ख्रिस गेल आणि अॅरोन फिंच यांनी त्याच्याजवळ पोहचण्याचा प्रयत्न केला पण त्यांना २०० धावा करणे शक्य झाले नाही. पण काल खेळल्या गेलेल्या सामन्यात विंडीजच्या एका निवृत्त क्रिकेटपटूने चक्क द्विशतक झळकवले आहे.

२ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात विंडीजच्या ४४ वर्षीय शिवनारायण चंद्रपॉलने द्वीशतक ठोकले आहे. त्याने अॅडम सन्फोर्ड क्रिकेट फॉर लाईफ टी-२० मालिकेत यूएसए की मॅड डॉग्स संघाविरुध्द ७६ चेंडूत २५ चौकार आणि १३ गगनचुंबी षटकार लगावत २१० धावांची तुफानी खेळी केली. चंद्रपॉलच्या या शतकाने त्यांच्या संघाने ३०३ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात त्यांचा १९२ धावांनी विजय झाला.

३ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून चंद्रपॉल निवृत्त झाला आहे. विंडीजकडून खेळताना त्याने कसोटी सामन्यांत ११ हजार ८६७ धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ८ हजार ७७८ धावांची नोंद आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी त्याने केलेली ही कामगिरी पाहून अद्याप त्याच्यात क्रिकेट शिल्लक असल्याचे दिसून येते.

Leave a Comment