लंडनः आपल्या पत्नीबरोबर कोणताही पती शय्यासोबत करु शकतो, हा त्याचा मूलभूत अधिकार असल्याचे लंडनमधील इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एपी हेडन यांनी स्पष्ट केले आहे. न्यायाधीश हेडन यांनी हा निर्णय कोर्ट ऑफ प्रोटेक्शनच्या एका प्रकरणात दिला आहे.
पत्नीबरोबर शय्यासोबत करणे हा पतीचा मूलभूत अधिकार – उच्च न्यायालय
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पतीबरोबर शय्यासोबत करण्यास एका पत्नीने नकार दिला होता. त्यानंतर न्यायालयाचे दरवाजे पतीने ठोठावले. पत्नीच्या बाजूने कनिष्ठ न्यायालयाने निर्णय देऊन 20 वर्षं संबंध प्रस्थापित करण्यावर बंदी घातली होती. पतीने त्यानंतर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. पतीच्या बाजूने उच्च न्यायालयाने निर्णय दिला. आपल्या पत्नीबरोबर पतीला शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे. तसेच कोणीही पत्नी या पतीच्या मूलभूत अधिकारावर बंदी आणू शकत नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर यासंदर्भात संसदेत लेबर पार्टीनेही प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान लेबर पार्टीचे खासदार म्हणाले, ब्रिटनमध्ये कोणाही व्यक्तीला जोरजबरदस्तीने सेक्स करण्याचा अधिकार नाही. अशातच पत्नीच्या विरोधात जाऊन एखाद्या पतीने सेक्स केल्यास तो बलात्कार समजला जातो. तसेच एका महिलेने ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, सेक्स हा काही मानवाधिकार नसून अनेकांनी न्यायालयाच्या निर्णयावर असहमती दर्शवली आहे. पत्नीच्या इच्छेविरोधात जाऊन संबंध प्रस्थापित करण्याचा कोणत्याही पतीला अधिकार नसल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे.