पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘झायेद मेडल’ने सन्मानित करणार यूएई

narendra-modi
नवी दिल्ली – संयुक्त अरब अमिरातचा (यूएई) सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘झायेद मेडल’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरवण्यात येणार असून याची घोषणा खुद्द यूएईचे राजपुत्र मोहम्मद बिन झायेद यांनी ट्विट करुन केली आहे. आमचे भारतासोबत ऐतिहासिक आणि व्यापारी संबंध आहेत. माझे मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी महत्वाची भूमिका असल्याचे राजपुत्र झायेद यांनी म्हटले आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदींचे कौतुक दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध निर्माण करण्यासाठी करत त्यांना झायेद मेडलने सन्मानित करण्याचा निर्णय यूएईच्या राष्ट्रपतींनी घेतला आहे. भारतात हल्ले करणाऱ्या अनेक दहशतवाद्यांना यूएईने भारताकडे सोपवले आहे. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणातील ख्रिश्चियन मिशेललाही काही दिवसांपूर्वी भारताकडे सोपवण्यात आले होते. याप्रकरणातील आणखी एक आरोपी दीपक तलवारलाही भारताकडे सोपवण्यात आले होते.

Leave a Comment