फेक न्यूज थांबवणार व्हॉट्सअॅपचे ‘चेकपॉईंट टिपलाईन’

whatsapp
नवी दिल्ली : फेक न्यूज, फोटो आणि फेक मेसेजेस आणि खोट्या माहिती रोखण्यासाठी सोशल मीडियात अग्रेसर असलेल्या व्हॉट्सअॅपने ‘चेकपॉईंट टिपलाईन’ लॉन्च केले आहे. युजर्सना ‘चेकपॉईंट टिपलाईन’च्या मदतीने त्यांना मिळालेला मेसेज खरा आहे की खोटा याबाबतची खात्री करुन घेता येईल.

खोट्या बातम्या आणि खोट्या माहितीपासून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी युजर्सना दूर ठेवणे हे सोशल मीडिया समोर सर्वात मोठे आव्हान आहे. फेसबुककडून गेल्या काही दिवसांपासून त्यासाठी विशेष उपायजोजना राबवल्या जात असताना फेसबुकने स्वतःच्याच मालकीच्या व्हॉट्सअॅपसाठीदेखील महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

याबाबत व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकने म्हटले आहे की, टिपलाईन भारतातील स्किलिंग स्टार्टअप PROTO ने लॉन्च केले आहे. एक डेटाबेस या टिपलाईनद्वारे तयार केला जाईल. याद्वारे निवडणुकांदरम्यान फेक न्यूज आणि माहितीचा अभ्यास केला जाईल. त्यामुळे खोट्या माहितीचा प्रसार थांबवणे व्हॉट्स्अॅपसाठी सोपे जाईल.

Leave a Comment