पेटीएम देत आहे घरबसल्या पैसे कमवण्याची संधी

paytm
मुंबई : पेटीएमला 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या 2019-20 या आर्थिक वर्षासाठी मोठी मान्यता मिळाली असून पेटीएम अ‍ॅपद्वारे आता तुम्ही देखील शेअर बाजारात पैसे गुंतवू शकता. पेटीएमच्या सब्सिडियरी कंपनीला पेटीएम मनीला स्टॉक ब्रोकिंग सर्विससाठी शेअर बाजार रेग्युलेटर सेबीने मंजुरी दिली आहे. याद्वारे आता गुंतवणूकदार शेअर खरेदी करू शकतात. पेटीएमने याआधी म्युच्युअल फंडाची सेवा सुरू केली आहे. तुम्ही याद्वारे म्युच्युअल फंडात 100 रुपयांची एसआयपी करू शकता.

पेटीएमने यासाठी 24 म्युच्युअल फंडसारख्या सेवा देणाऱ्या कंपन्यांशी करार केला आहे. बँकेत एफडी करण्यासाठी 7 ते 9 टक्के रिटर्न मिळतात. म्युच्युअल फंडात हे रिटर्न 15 टक्के असतात. म्युच्युअल फंडात मिळणारे रिटर्न शेअर बाजारावर अवलंबून असते. पेटीएम मनीने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की सेबीमधून स्टॉक ब्रोकिंग सर्विसेजसाठी कंपनीला मंजुरी मिळाली आहे. तसेच स्टाॅक एक्स्चेंज बीएसई आणि एनएसईच्या मेंबरशिपसाठी मंजुरी मिळाली आहे. लवकरच आमच्या प्लॅटफाॅर्मवर इक्विटी आणि कॅश सेग्मेंटस, डेरिव्हेटिव्ह्ज, ईटीएफएस आणि इतर एक्स्चेंज ट्रेडेड प्रॉडक्टचे ट्रेडिंग करू शकता.

पेटीएमने याशिवाय अमेझॉन आणि फ्लिपकार्ट प्लस या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सब्सक्रिप्शन लॉयल्टी प्रोग्राम ‘पेटीएम फर्स्ट’ नुकताच लॉन्च केला. आता एकाच ठिकणी मनोरंजन, शॉपिंग आणि फूड यासारखे अ‍ॅप पेटीएमच्या या नव्या सेवेमुळे वापरता येणार आहे. माहितीनुसार या अ‍ॅपच्या सब्सक्रायबर्सना पेटीएमकडून विशेष लाभ मिळाणार आहेत.

750 रुपये एवढी पेटीएमची एका वर्षाची सब्सक्रायबर फी आहे. आताच्या या नव्या प्रोग्रामनुसार पेटीएममधूनच मनोरंजन, शॉपिंग आणि फूड अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन घेतल्यास पेटीएमकडून 100 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. पण या कॅशबॅकला वेळेची मर्यादा असणार आहे. तसेच पेटीएम मॉलमधून शॉपिंग करणाऱ्या पेटीएम फर्स्टच्या सब्सक्रायबला अनलिमिटेड फ्री आणि प्रायॉरिटी शॉपिंग सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Comment