हे आहेत जगातील सर्वाधिक चर्चेत आलेले ‘एप्रिल फूल’

april-foll
एक एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात ‘एप्रिल फूल्स डे’ म्हणून साजरा केला जातो. काही तरी थाप ठोकून देऊन इतरांचा उडणारा गोंधळ पाहून स्वतःची करमणूक करून घेण्याचा हा दिवस. हा दिवस येऊ घातला, की एक दोन दिवस आधीपासूनच फोनवर, सोशल मिडीयावर ‘एप्रिल फूल’ची धमाल सुरु होते. काही थापा न पचणाऱ्या असतात, तर काहींवर आपला पटकन विश्वासही बसतो. ही थाप एप्रिल फूलची होती हे लक्षात आल्यानंतर खरा उलगडा होतो. अगदी विराट कोहलीने भारत क्रिकेटसंघाची नेतृत्वाची धुरा सांभाळण्यास नकार दिला इथपासून वेफर्सच्या पाकिटांवर फिंगरप्रिंट सेन्सर लावले असल्याच्या अनेक थापा आजवर सोशल मिडियावरून लोकांना हसवून गेल्या. जगाच्या इतिहासामध्येही काही नामांकित कंपन्यांनी देखील ‘एप्रिल फूल्स डे’ च्या निमित्ताने लोकांना असे काही ‘फूल’ बनविले, की त्यांच्या या थापा काही काळाकरिता तरी सर्वाधिक चर्चिल्या गेल्या.

२००९ साली सुप्रसिद्ध अमेरिकन ग्लोबल ट्रॅव्हल टेक्नोलॉजी कंपनी ‘एक्सपीडिया’ने आपल्या कंपनीतर्फे लवकरच मंगळावर जाण्यासाठी विमान सेवा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली. ही यात्रा कशी असणार आहे याचे अतिशय आकर्षक रीतीने सचित्र वर्णन करण्यात येऊन या विमानसेवेचे शुल्क केवळ ९९ डॉलर्स असल्याचे कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर मंगळावर पोहोचल्यानंतर यात्रेकरूंसाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध असल्याचे म्हटले गेले होते. इतक्या मोठ्या कंपनीकडून अशा प्रकारची जाहिरात केली गेल्यानंतर लोकांचाही त्यावर विश्वास बसला, मात्र योग्य वेळी कंपनीच्या वतीने ही ‘एप्रिल फूल’ ची थाप असल्याचे घोषित करण्यात आल्याने लोकांचे भरपूर मनोरंजनही झाले.
april-foll1
२०१७ साली अॅमेझॉच्या वतीने ‘पेटलेक्सा’ बाजारामध्ये येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. सध्या ज्याप्रकारे आपण अॅमेझॉनने आणलेल्या ‘अलेक्सा’शी संवाद साधू शकतो, त्याचप्रकारे ‘पेटलेक्सा’ घरातील पाळीव प्राण्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे आपल्या पर्यंत पोहोचविणार असल्याचे अॅमेझॉनचे म्हणणे होते. तसेच पेटलेक्साचा वापर करून प्राणी आपल्या मनपसंत वस्तूही ऑनलाईन ऑर्डर करू शकणार असल्याचे म्हटले होते. ‘आजकाल काहीही घडणे शक्य आहे’ या भावाला अनुसरून ग्राहकांना देखील हे नवे प्रोडक्ट बाजारात कधी येते याची उत्कंठा लागून राहिली. कालांतराने खरा प्रकार उघडकीला आल्यानंतर अॅमेझॉनच्या कल्पकतेला लोकांनी भरभरून दाद दिली. अमेझॉन प्रमाणे गुगलने देखील ‘एप्रिल फूल्स डे’च्या निमित्ताने खास प्राण्यांसाठी ‘गुगल प्ले फॉर पेट्स’ नामक अॅप आपण लवकरच सादर करणार असून, या अॅपद्वारे प्राण्यांना मोबाईल फोनवरून अनेक गेम्स खेळता येणे शक्य होणार असल्याची थाप ठोकली होती.
april-foll2
दोन वर्षांपूर्वी भारतामध्ये ग्राहकांना ‘फूल’ बनविण्यात ‘लेज इंडिया’ या चिप्स बनविणाऱ्या कंपनीचा प्रयत्न चांगलाच यशस्वी झाला. चिप्स हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा असल्याने आपल्या पॅकेटमधील चिप्स कोणासोबत वाटून घेण्याला बहुतेकांचा आक्षेप असतोच. त्यातून एका पॅकेटमध्ये आधीच थोड्याश्या चिप्स आणि त्याही वाटून खायच्या म्हणजे अगदी जीवावर येते. पण काही बहाद्दर चिप्सचे पॅकेट दिसले, की ते कोणाचे आहे याचा विचार न करता ते उघडून चिप्सवर ताव मारू लागतात. अशाच बहाद्दरांपासून आपल्या चिप्सचे पॅकेट सुरक्षित ठेवण्यासाठी आतापासून ‘लेज’च्या प्रत्येक पाकिटावर ‘फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन’ तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी एक चीप लावली जाणार असून, चिप्सचे पॅकेट ज्या व्यक्तीने उघडले, त्या व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला हे पॅकेट पुनश्च उघडता येणार नसल्याचे हे तंत्रज्ञान असल्याचे ‘लेज’च्या वतीने सांगण्यात आले होते. आता तरी आपल्या चिप्स सुरक्षित राहतील आणि इतर कोणी त्या खाऊ शकणार नाही अशी खात्री उराशी बाळगून मनोमन खुश झालेले चिप्सप्रेमी मात्र अर्थातच ‘एप्रिल फूल’

Leave a Comment