परिणीती पडली सानिया मिर्झाच्या मुलाच्या प्रेमात

parineeti-chopra
आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने दुबईत वास्तव्यास आहे. याच दरम्यान इन्स्टाग्रामवर एक फोटो तिने पोस्ट केला आहे. परिणीतीसोबत या फोटोमध्ये एक चिमुकला पहायला मिळत आहे. या फोटोसोबत तिने एक आकर्षक कॅप्शनदेखील दिले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.

टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू शोएब मलिक यांचे फोटोमध्ये परिणीतीसोबत दिसत असलेले बाळ आहे. या गोंडस बाळाचे नाव इजहान असे असून तो परिणीतीच्या मांडीवर बसल्याचे पाहायला मिळत आहे. परिणीतीच्या हातासोबत इजहान खेळतांना दिसत असल्यामुळे परिणीतीने त्याच्या या बाललीला पाहुन हा फोटो शेअर करत त्याला शोभेल असे कॅप्शन दिले आहे.


माझा हात इज्जूने त्याच्या लहानग्या हातात धरला असून खाण्याचा तो प्रयत्न करत आहे. सानिया तुझा हा गोड इज्जु मला प्रचंड आवडला असून त्याला मी माझ्या घरी घेऊन जाऊ का ? असे कॅप्शन सानियाने या फोटोला दिले आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी परिणीती दुबईत आहे. तिने शूटिंगदरम्यान फावल्या वेळेत सानिया मिर्झा आणि तिच्या चिमुकल्याची भेट घेतली. परिणीती बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. सध्या त्याचीच शूटिंग दुबईत सुरू आहे.

Leave a Comment