अमेरिका – लवकरच जगात सर्वप्रथम बर्फात गोठवून ठेवलेल्या मृत मानवाला जीवंत करू शकतात असा दावा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. हा विचित्र दावा अमेरिकेच्या मिशिगन येथील क्रायोनिक्स इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष डेनीस कोव्हाल्स्की यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, सर्वप्रथम १९६७मध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर गोठवून ठेवले होते. त्याला भविष्यात पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न केला जाईल या आशेने असे केले होते. आम्ही या प्रयोगाच्या आता अगदी जवळ पोहोचले असल्याचे डेनिस यांनी सांगितले.
१९६७ साली मेलेल्या मानवाला पुन्हा जीवंत करणार अमेरिका
याबाबत माहिती देताना डेनिस सांगतात की, क्रायोनिक्स किंवा क्रायोप्रिझर्व्हेशन असे या संपूर्ण प्रक्रियेला म्हणतात. जेम्स बेडफोर्ड नावाच्या व्यक्तीचे शरीर या प्रक्रियेद्वारे मृत्यूनंतर गोठवून ठेवले होते. डेनीस सांगतात की, शरीर गोठवून ठेवलेला हा व्यक्ती पुन्ही जीवंत होईल की नाही हे कोणी सांगू शकणार नाही. पण तुम्हाला मृत्यूनंतर दफन केले किंवा जाळले तर पुन्हा जीवंत करण्याची काहीही शक्यता नाही, हे नक्कीच कोणीही सांगू शकते.
याबाबत अनेक शास्त्रज्ञ असे मानतात की, शरीर अत्यंत थंड वातावरणात गोठवून ठेवलेल्या व्यक्तीला जीवंत करण्याची शक्यता अधिक आहे. असा प्रयोग सशावर करण्यात आला आहे. क्रायोनिक्स तंत्राद्वारे एका सशाचा मेंदू थंड वातावरणात गोठवून ठेवण्यात आला होता. त्याचा मेंदू अनेक आठवड्यांनंतरही सुरक्षित होता. पण शास्त्रज्ञ असे मानतात की मृत सशाचा मेंदू पुन्हा सुरू करणे आणि मेलेल्या व्यक्तीला जीवंत करणे यात खूप फरक आहे.
पण डेनिस यांचे असे मानने आहे की, या प्रयोगाच्या ते फार जवळ पोहोचले असून क्रायोनिक्स किंवा अत्यंत थंड वातावरणात आगामी दहा वर्षांत मृताचे शरीर ठेवून त्याला पुन्हा जीवंत करणे सहज शक्य होऊ शकेल. डेनीस म्हणाले की, शास्त्रज्ञ याबाबतही अभ्यास करत आहेत की, या तंत्राद्वारे पुन्हा जीवंत झालेल्या व्यक्तीचा अनुभव नेमका कसा असेल. मृत्यूच्या किती वर्षानंतर तो जीवंत होईल यावर बरेच काही अवलंबून असेल. याबाबत काही लोक असे ही म्हणतात की, तीस चाळीस वर्षे याला लागू शकतात. तो व्यक्ती इतक्या दिवसांनंतर जीवंत झाला तर त्याचे नातू स्वागतासाठी उपस्थित असतील. पण पुन्हा जीवंत व्हायला शंभर किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे लागली तर नातेवाईक त्या व्यक्तीला विसरले असतील हे नक्की. पण पुन्हा जीवंत झालाच तर त्या व्यक्तीला बदललेल्या काळात अॅडजस्ट होण्यासारख्या अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नव्या वातावरणात जुळवून घेणे त्याच्यासाठी कठीण असेल.
या प्रक्रियेचे शास्त्रज्ञांचा एक वर्ग समर्थन करत आहे. तर हा पैशाचा अपव्यय असल्याचे काही लोक सांगत हा वेडेपणा असल्याचे म्हणतात. हे अशक्य आहे. कारण हा प्रकार मृत्यूला पराभूत करण्याचा आहे. मानवाच्या अस्तित्वाचा मृत्यू हा महत्त्वाचा भाग असल्यामुळे मृत्यूला संपवणे हा प्रकार नवे प्रश्न उपस्थित करणारा आहे.