नवज्योत सिंग सिद्धू यांची ‘द कपिल शर्मा शो’मध्ये वापसी ?

kapil-sharma
जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसाठी पुळका काढणाऱ्या माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेता नवज्योत सिंग सिद्धू यांना नेटकऱ्यांनी चांगलेच झोडपून काढल्यानंतर त्यांची या शोमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यातच आता त्यांची या शो मध्ये वापसी होणार असल्याच्या चर्चा सध्या सिनेवर्तुळात सुरु आहे.

नुकतीच एका कार्यक्रमात कपिलने उपस्थिती लावली होती. कपिलला सिद्धू शोमध्ये परतणार का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला होता. सिद्धूंच्या वापसीबद्दल कपिल सकारात्मक दिसला . सध्या लोकसभा निवडणुकांमध्ये सिद्धू व्यस्त असल्यामुळे शोमध्ये ते परतणार नाहीत पण ते निवडणुकांनंतर शोमध्ये येतील, असे कपिलने म्हटले आहे.

सिद्धू यांनी पुलवामा हल्ल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी या प्रतिक्रियेत एकप्रकारे पाकिस्तानची पाठराखण केली. सोशल मीडियावर सिद्धू यांच्या प्रतिक्रियेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांना शोमधून काढून टाकण्याची मागणी प्रेक्षकांनी केली होती. या मागणीनंतर त्यांची ‘द कपिल शर्मा’ शोमधून गच्छंती करण्यात आली होती.

Leave a Comment