प्रचारा दरम्यान उर्मिलाने घेतला वडापावाचा आस्वाद

urmila-matondkar
मुंबई: काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर टेम्पल रन केलेल्या उर्मिलाने मतांसाठी मुंबईकरांच्या स्ट्रीट फूड वडापावची चव चाखली. विशेष म्हणजे रविवारी रात्री तिने रिक्षाही चालवली होती.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ते उमेदवारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत आहेत. नुकतीच राजकारणात सक्रिय झालेली उर्मिला पहिल्या दिवसांपासून जोरदार प्रचाराच्या कामाला लागली आहे. उर्मिलाने रविवारी सुट्टीच्या दिवसाचे निमित्त साधत रिक्षावाल्यांसोबत वेळ घालवला. त्याचबरोबर तिने मतांसाठी रिक्षाही चालवली. यानंतर संध्याकाळच्या सुमारास एका प्रचारसभेचे आयोजन करत तिथे मराठी आणि गुजरातीत भाषण केले.

उर्मिला सोमवारी रात्रीच्या वेळी अचानक बोरीवली परिसरात प्रसिद्ध वडापावच्या गाडीजवळ पोहोचली. तिने त्यानंतर चक्क वडापाव खाल्ला, त्याचबरोबर वडापाव खाल्ल्यानंतर त्याची चव कशी होती हे देखील सांगितले.


राजकारणात सक्रीय होत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर काँग्रेसकडून उर्मिलाला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच तिने बोरीवलीतील साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले होते. त्यानंतर तिने गुरुद्वारामध्ये जाऊनही दर्शन घेतले होते.

Leave a Comment