एका दिवसामध्ये किती बदाम खाणे योग्य आहे?


परीक्षांचे दिवस जवळ येत आहेत. मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांन बदाम खाऊ घालण्याची पद्धत बहुतेक सर्वच घरांमध्ये आहेत. मुलांच्याशिवाय घरातील इतर लोकही आपल्या त्वचेची, केसांची आणि शरीराच्या एकंदर आरोग्याची काळजी घेण्यासाठी बदामाचे सेवन करीत असतात. बदामांच्या सेवनाचा जास्तीत जास्त फायदा मिळावा या करिता बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेऊन मग दुसऱ्या दिवशी सकाळी खावेत. बदाम खाण्याची ही रीत बहुतेक सर्वांना ठाऊकच असेल.

बदाम केसे खावेत, त्यासोबतच एका दिवसामध्ये किती बदाम खावेत याचा ही विचार करणे अगत्याचे आहे. बदामांचे सेवन नियमित केल्याने हृदय, मेंदू, त्वचा आणि केसांशी संबंधित विकार दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर बदामाचे सेवन मधुमेह, खोकला, अनिमिया, श्वसनरोगामध्येदेखील फायद्याचे आहे. बदामाच्या सेवनाने पचनशक्ती आणि शरीराच्या मेटाबोलिक रेट मध्ये सुधार होतो. तसेच वजन घटविण्यासाठी देखील बदामाचे सेवन फायदेशीर आहे. पण बहुतेक व्यक्तींना एका दिवसामध्ये किती बदाम खाल्ले जावेत ह्याची कल्पना नसते.

आहार तज्ञांच्या मते, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचे हवामान, दिवसभरामध्ये तुम्हाला शारीरिक श्रम किती होतात, यावर बदामाचे सेवन अवलंबून असायला हवे. जर तुम्ही उष्ण हवामानाच्या ठिकाणी रहात असाल, तर एका दिवसामध्ये पाच ते सहा बदामाचे सेवन करावे. त्याचबरोबर शारीरिक श्रम जास्त होत असतील दररोज आठ ते दहा बदाम खाणे योग्य आहे. बदामाच्या अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. यामध्ये बद्धकोष्ठ, काही प्रकारचे त्वचा रोग, अत्याधिक प्रमाणामध्ये घाम येणे अश्या प्रकारचे दुष्परिणाम बदामाच्या अति सेवनाने होऊ शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment