ही तथ्ये तुमच्या परीचायची आहेत का?

fact
आपल्या आसपास ज्या आपल्या परिचयाच्या किंवा नेहमीच आपल्या पाहण्यात येणाऱ्या गोष्टी असतात, त्या वस्तूंबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आवर्जून क्वचितच केला असेल. मात्र आपल्या नेहमीच्या पाहण्यात असलेल्या गोष्टींशी निगडित अनेक रोचक तथ्ये आहेत, ज्यांची माहिती आपल्या नसते. अशाच काही तथ्यांबाद्द्ल जाणून घेऊ या.
fact1
१९३९ सालापासून उत्तर अमेरीकेमध्ये मुलांना शाळेमध्ये नेण्या-आणण्यासाठी ज्या बसेस वापरल्या जात, त्या बसेसना पिवळा रंग दिला जाऊ लागला. कालांतराने शाळेच्या बसेसना दिला जाणारा रंग ‘स्कूल-बस येलो’ याच नावाने ओळखला जाऊ लागला. इतर रंगांच्या मानाने हा रंग अधिक झटकन दिसणारा असल्याने हा रंग शाळेच्या बसेसना देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात असे, पण त्याचबरोबर या रंगावर काळ्या रंगाने लिहिलेली अक्षरे अंधुक प्रकाशामध्येही वाचता येणे शक्य झाले असल्याने शाळेच्या बसेस या रंगामध्ये रंगविल्या जाऊ लागल्या. कालांतराने हे धोरण इतर अनेक देशांनी अवलंबिले.
fact2
आजकाल एखादे चक्रीवादळ येत असले, की हवामान खात्यातर्फे या चक्रीवादळाचे नामकरण केले जाते. १९५० सालापूर्वी अशा चक्रीवादळांना केवळ महिलांची नावे दिली जात असत. इंग्रजी भाषेमध्ये जिथे चक्रीवादळ तयार होते तो महासागर, म्हणजेच ‘ओशन’चा उल्लेख स्त्रीलिंगी केला जात असे, म्हणूनच महासागरापासून उत्पन्न झालेल्या चक्रीवादळांना स्त्रियांची नावे दिली जात असत. मात्र अमेरिकेतील फेमिनिझमच्या पुरस्कर्त्यांनी यावर आक्षेप घेतला आणि चक्रीवादळांना केवळ महिलांची नावे न दिली जाता पुरुषांची नावे ही दिली जावीत असा आग्रह धरला. तेव्हापासून चक्रीवादळांना महिलांची आणि पुरुषांची नावे देण्यात येऊ लागली.

Leave a Comment