जुगारी कोंबड्यांना पोलिसांनी टाकले तुरुंगात

cock
हरयाणातील नूंह जिल्ह्यात पोलिसांनी कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली असून जुगाऱ्यांसोबत कोंबड्यांनाही ही कारवाई महागात पडली. 18 जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली त्याचबरोबर 6 कोंबड्यांनाही पोलीस स्टेशनची हवा खावी लागली आहे.

या संदर्भात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कोंबड्यांची झुंज लावून काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलीस तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले अन् 6 कोंबड्यांसह जुगाऱ्यांना अटक केली. त्याचसोबत 35 हजार रुपये रोख आणि तीन वाहने जप्त करण्यात आली

तुसैनी गावामध्ये अशाप्रकारे कोंबड्यांची झुंज सुरु असल्याचा फोन आला. यामध्ये फक्त गावातीलच नाही तर इतर राज्यांतूनही काही जण जुगार खेळण्यासाठी आले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याच माहितीच्या आधारे आरोपींना पकडण्यासाठी गावात पोहचले. तेव्हा तिथे सुरु असलेला खेळ बंद करुन जुगार खेळणाऱ्यांना अटक केली.

कोणाच्या मालकीचे 6 कोंबडे आहेत हे न कळाल्यामुळे कोंबड्यांनाही पोलिसांनी जेलमध्ये बंद केले. जानेवारी 2018 मध्ये बैतूल जिल्ह्यातील आठनेर पोलीस ठाणे क्षेत्रात कोंबड्यांच्या झुंजीचा खेळ सुरु होता त्यावेळी पोलिसांनी आरोपींसह 2 कोंबड्यांना अटक केली होती.

Leave a Comment