तब्बल तीन अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार कार्तिक आर्यन

kartik-aaryan
दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटात सारा अली खान आणि कार्तिक आर्यन झळकणार असल्याची बातमी आम्ही तुम्हाला यापूर्वीच दिली आहे. त्याचबरोबर त्यांचा चित्रपटातील फर्स्टलुक देखील तुमच्या भेटीला आला होता. अद्याप चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात असले तरी मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे नाव ‘लव आज कल 2’ असे असणार आहे.

हा सारा आणि कार्तिकच्या जोडीचा पहिला चित्रपट असल्यामुळे दोघांचे फॅन्स खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटासंदर्भात आता आणखी एक अशी माहिती मिळत आहे की कार्तिक या चित्रपटात फक्त सारासोबत नाही तर आणखी दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार आहे. रिपोर्टनुसार सारा यात मुख्य अभिनत्रीच्या भूमिकेत असेल तर बाकी दोन अभिनेत्री सहाय्यक भूमिकेत दिसतील. पण या दोन अभिनेत्री कोण असणार आहेत हे अद्याप कळलेले नाही.

इम्तियाज अलीने लव्ह आज काल या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि इम्तियाजनेच या चित्रपटाच्या सिक्वलच्या दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो देखील या चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण आता दिल्लीतील चित्रीकरण संपले असून ही गोष्ट सारानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या फॅन्सना सांगितली होती.

Leave a Comment