नवी दिल्ली – ऑलिम्पिक खेळाडू कृष्णा पुनियाला काँग्रेसने सोमवारी जाहीर केलेल्या उमेदवार यादीत जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये थाळीफेक प्रकारात कृष्णा पुनियाने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. काँग्रेसने आतापर्यंत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३२५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
राज्यवर्धन राठोड यांना टक्कर देणार सुवर्णपदक विजेत्या कृष्णा पुनिया
सध्या राजस्थानच्या सादुलपूर विधानसभा मतदारसंघातून कृष्णा पुनिया आमदार आहे. राज्यवर्धन राठोड यांच्या बरोबर कृष्णा पुनियाची थेट लढत होणार आहे. केंद्र सरकारमध्ये ऑलिम्पिक पदक विजेते राज्यवर्धन राठोड माहिती आणि प्रसारणमंत्री आहेत. त्याचबरोबर जयपूर ग्रामीणचे राज्यवर्धन राठोड खासदार आहेत. काँग्रेसने सोमवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये सहा राजस्थानचे, दोन महाराष्ट्र आणि एक गुजरातचा उमेदवार आहे. २०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत कृष्णा पुनियाने थाळीफेकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.