निवडणूक आयोगाने संजय राऊत यांना बजावली नोटीस

sanjay-raut
नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने संजय राऊत आणि सामना या वृत्तपत्राला नोटीस बजावल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. 31 मार्चच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील रोखठोक या सदरात एक लेख होता, ज्यामध्ये ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने यावरच आक्षेप घेत ही नोटीस बजावली आहे. या नोटीशीत आचारसंहिता सुरू असताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी सामनामधील लिखाणाबाबत मला नोटीस मिळाली असून आम्ही निवडणूक आयोगाचा पूर्ण आदर करत असून दिलेल्या वेळेत निवडणूक आयोगाला उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे. दरम्यान, भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना लोकसभेच्या रिंगणात बेगुसरायमधून लढणाऱ्या कन्हैया कुमार यांनी थेट आव्हान दिल्यामुळे देशातील सर्वाचे लक्ष देखील या लढतीकडे आहे. कन्हैया कुमार यांनी लोक वर्गणीतून निवडणुकीकरता पैसे गोळा केले आहेत. जेएनयुमध्ये झालेल्या आंदोलनानंतर कन्हैया कुमार राजकारणात सक्रिय झाले. दरम्यान, त्यांनी वेळोवेळी भाजपला देखील लक्ष्य केले आहे.

Leave a Comment