शेतकरी, दलित, महिला आणि तरूणांना काँग्रेसच्या ‘जन आवाज’ जाहीरनाम्यात प्राधान्य

congress
नवी दिल्ली – मंगळवारी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद आयोजित करत आपला ‘जन आवाज’ जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर ‘हम निभाएंगे’ असे आश्वासन देण्यात आले आहे. मंचावर यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.

या जाहीरनाम्यात शेतकरी, दलित, महिला आणि तरूणांना प्राधान्य देण्यात आले आहे. जाहीरनाम्याची निर्मिती १२१ ठिकाणावर भेट देऊन करण्यात आल्याचे यावेळी चिदंबरम यांनी सांगितले. या जाहीरनाम्यात राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण यासह अनेक मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील प्रत्येक घटकाचा विचार जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. शेतकरी, दलित, महिलांना प्राधान्य काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. बेरोजगारीचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, काँग्रेस देशातील बेरोजगारीवर काम करणार असल्याचे चिदंबरम म्हणाले. काँग्रेससाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितले. ते पुढे बोलातना म्हणाले की, भारत २०३० पर्यंत गरिबीमुक्त करू असे आश्वासन मनमोहन सिंह यांनी यावेळी दिले आहे.

Leave a Comment