इस्रोकडून एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

isro
श्रीहरिकोटा – आज सकाळी श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपकाच्या मदतीने भारतीय अवकाश संशोधन संस्थेने एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे २८ नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

इस्रोने आज एकाच वेळी एमीसॅट आणि नॅनो उपग्रह अंतराळात पाठवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपक सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी एमीसॅट व २८ नॅनो उपग्रहांना घेऊन झेपावले. चांद्रयान २००८ व मंगळ ऑर्बिटर २०१३ या दोन्ही मोहिमांमध्ये पीएसएलव्ही प्रक्षेपकाने मोठी भूमिका पार पाडली होती. अमेरिकेतील २४, लिथुआनियातील ११ ,स्पेनमधील १ तर स्वित्झर्लंडमधील एका उपग्रहाचा यात समावेश आहे. इस्रोची ही ४७ वी पीएसएलव्ही मोहीम असून आजची मोहीम चार टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे.

Leave a Comment