मेजर लितुल गोगोईंना ‘त्या’ महिलेशी मैत्री पडली महागात

Major-Leetul-Gogoi
नवी दिल्ली – मेजर लितुल गोगोई यांना श्रीनगर येथील हॉटेलमध्ये एका महिलेसोबत गेल्याप्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागले असून सेवाज्येष्ठता त्यांना यामुळे गमवावी लागणार आहे. सहा महिन्यांचा सेवाज्येष्ठतेचा अधिकार गमावण्याची शिक्षा गोगोई यांना सुनावण्यात आली आहे.

मे २०१८ मध्ये एका महिलेसोबत श्रीनगरमधील हॉटेलमध्ये लितुल गोगोई हे गेले होते. १८ वर्षांची ही महिला होती, गोगोई यांना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी समवेत असलेल्या महिलेच्या वयावरुन हटकले असता त्याठिकाणी त्यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्या घटनेनंतर गोगोई यांच्याविरोधात कोर्ट मार्शलच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. गोगोई यांच्याविरोधात आता कोर्ट मार्शलची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना सहा महिन्यांचा सेवाज्येष्ठतेचा अधिकार गमवावा लागणार आहे. या प्रकरणी त्यांना स्थानिक महिलेशी जवळीक करुन कामाच्या ठिकाणापासून दूर गेल्यामुळे जबाबदार ठरवण्यात आले आहे.

Leave a Comment