लग्नाआधीच पोटोशी राहिली ही अभिनेत्री

amy-jackson
अक्षय कुमार, अजय देवगण सारख्या अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करणारी अभिनेत्री अॅमी जॅक्सन लग्नाआधीच पोटोशी असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या भावी पतीसोबतचा एक फोटो अॅमीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.


त्या फोटोला तिने मी ही बातमी माझ्या घराच्या छतावर उभी राहून ओरडून ओरडून सांगणार होते पण आजच्या दिवसापेक्षा जास्त चांगला दिवस असू शकत नाही. मी तुझ्यावर आत्तापासूनच खूप प्रेम करू लागले आहे. तुझ्यासाठी माझे प्रेम प्युअर आहे. आम्ही तुला भेटण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, असे कॅप्शन दिले आहे. काही लोकांना तिची पोस्ट वाचून खूप आनंद होत आहे तर काहीजण ‘विना लग्नाचेच’ अशा कमेंट करत आहेत.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला अॅमी जॅक्सनने आपल्या बॉयफ्रेंड जॉर्जसोबत साखरपुडा केला. तिने याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. अॅमीने यासोबत जानेवारी 2019 ला आयुष्याचा एक नवा प्रवास सुरु होत आहे, असल्याचे कॅप्शन लिहिले होते. अॅमी 2018 मध्ये रजनीकांत यांच्यासोबत फिल्म ‘2.0’ मध्ये लीड रोलमध्ये दिसली होती. अक्षय कुमार यामध्ये खलनायक बनुन आपल्या समोर आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. याव्यतिरिक्त ती अक्षयसोबत ‘सिंह इज ब्लिंग’ या चित्रपटातही लीड रोलमध्ये दिसली आहे.

Leave a Comment