जगभ्रमंतीसह चाखा पदार्थांची चव आणि मिळवा 46 लाख रुपये पगार

vegna
आपल्या प्रत्येकाने जगभ्रमंतीसह तिथे मौजमजा करण्याचे स्वप्न पाहिलेच असेल. पण तुमचे हे स्वप्न पूर्ण करणारा एक भारी जॉब आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. पण हा जॉब देणाऱ्या कंपनीसाठी तुम्हाला केवळ जगभरात फिरायचे आहे आणि शाकाहारी पदार्थांचा शोध घ्यावा लागणार आहे. तुम्हाला या कामासाठी कंपनी वर्षाकाठी तब्बल 46 लाख रुपये पगार देणार आहे. तुम्हाला कंपनीकडून पगारासोबतच इतर खर्चासाठी देखील कंपनीकडून पैसे मिळणार आहेत.
vegna1
इंग्लंडमधील व्हाब्रंट वेगन कंपनीने या नोकरीची ऑफर दिली असून डायरेक्टर ऑफ टेस्ट या पोस्टसाठी कंपनी योग्य व्यक्तीचा शोध घेत आहेत. कंपनी अशा व्यक्तींचा शोध घेत आहेत, ज्यांना जगभ्रमंती करणे आणि वेगवेगळ्या देशातील प्रसिद्ध असलेल्या पदार्थांचा आस्वाद घेणे आवडत असेल.
vegna2
यासाठी ज्या व्यक्तीची निवड होईल कंपनी त्याला भारत, चीन, मेक्सिको आणि जपान या देशांच्या टूरवर पाठवतील. या व्यक्तीला या देशातील वेगवेगळ्या ठिकाणांवर जाऊन कंपनीसाठी वेगवेगळ्या वेगन फूडचा शोध लावायचा आहे. लोकल हॉटेलवाल्यांकडून त्यानंतर रेसिपीमध्ये असलेले सर्व साहित्य इंग्लंडला पोहोचवण्याची व्यवस्था करायची आहे.
vegna3
४८ लाख रूपये वर्षाला पगार या कामासाठी निवड झालेल्या व्यक्तीला दिला जाणार आहे. आठवड्यातून ३५ तास या व्यक्तीला काम करायचे आहे. कंपनीकडून येण्या-जाण्याचा खर्च आणि राहण्या-खाण्याचा खर्च केला जाईल. तसेच वर्षभरात २८ अधिकृत सुट्ट्या या व्यक्तीला सुद्धा मिळतील.
vegna4
कंपनीचे संस्थापक बुर्के हॅमिल्टन यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, जगभरात अनेक साहित्य आणि पाककृती आहेत. यापासून इंग्लंडमधील लोक अजूनही वंचित आहेत. मला आशा आहे की, जगभरातील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन आमचा नवा कर्मचारी त्याचा फूड चेनमध्ये सामिल करण्यात यशस्वी होईल.

Leave a Comment