अवघे 64 रुपये भाडे असूनही 11 वर्षांपासून रिकामी पडून आहे हा फ्लॅट

flat
मुंबई – मायानगरीत मुंबईत तुम्हाला जर कोणी अवघ्या क्षुल्लक रुपयांच्या भाड्यात आलिशान फ्लॅट राहायला देत असेल, तर तुम्ही त्याला नक्कीच नकार देणार नाहीत. पण मुंबईतील पॉश एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताडदेव परिसरात 800 स्क्वे. फुटच्या फ्लॅटला फक्त 64 रुपये दरमहा भाडे आहे. असे असूनही तो फ्लॅट मागील 11 वर्षांपासून मोकळा पडला आहे. ही बातमी वाचून बसला ना शॉक….

मुंबईत राहायला जागा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण फ्लॅटबाबत अशी माहिती आहे की, 1940मध्ये बांधल्या गेलेल्या एका इमारतीत हा फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये केवळ आणि फक्त केवळ पारशी धर्मीय पोलीस अधिकारीच राहू शकतो. २००८ मध्ये येथे सहायक पोलिस आयुक्त फिरोज गंजिया राहत होते. त्यानंतर हा फ्लॅट ओस पडला आहे. पारसी ट्रस्ट आर. डी. महालक्ष्मीची चॅरिटी बिल्डिंग विश्वस्तांच्या ताब्यात या फ्लॅटची मालकी आहे. मुंबई पोलीस दलात फक्त दोन पोलिस अधिकारी असे आहेत, जे पारसी होते. यापैकी एक मुंबईबाहेर आहेत, तर दुसऱ्या अधिकाऱ्याचे दिल्लीत घर आहे.

Leave a Comment