पगार न घेता करोड रुपयांची मालकीण आहे इवांका


इवांका ट्रम्प ही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आहे हे आपल्याला काही नव्याने सांगायला नको.

पण तुम्हाला हे माहित आहे का, की राष्ट्रपतीची मुलगी होण्याबरोबरच इवांका एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. इवांका फक्त ३७ वर्षाची असून ती आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत आहे. तसेच इवांका डोनाल्ड ट्रम्पची वरिष्ठ सल्लागार देखील आहे.

युनिर्व्हसिटी ऑफ पेंसिलवेनियाच्या व्हॉर्टन स्कूल ऑफ बिझनेसमधून इवांका पदवीधर आहे. तिने २००९ मध्ये जरेद कुशनरसोबत विवाह केला होता. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ट्रम्प ऑर्गनायझेशनची ती एक्झिक्युटिव वाइस प्रेसिंडेंट आहे. तसेच ट्रम्प हॉटेल्सची को फाऊंडर देखील आहे. इवांकाने २००७ मध्ये ज्वेलरी कलेक्शन लाँच केले होते. तर २०११ मध्ये इवांका नावाने रिटेल फॅशन लाइन सुरू केले आहे. त्यासोबतच शूज, हँडबॅग, अपॅरल्स, एक्ससेसरीज, ज्वेलरी, फ्रेगरेंस सारखे प्रोडक्टस ऑनलाइन आणि रिलेट स्टोर्स सारख्या गोष्टी विकल्या जातात.

अमेरिकेच्या राष्ट्रपतीची सल्लागार असल्यामुळे इवांकाने काही दिवसांपूर्वीच आपल्या संपत्तीची घोषणा केली आहे. व्हाइट हाउसच्या रिपोर्टनुसार इवांका जरी राष्ट्रपतींची सल्लागार म्हणून काम करत असली तरीही यासाठी ती कोणताही पगार घेत नाही. इवांका याव्यतिरिक्त ३० करोड डॉलर म्हणजे १९३५ करोड रुपयांची मालकीण आहे.

२०१४ पासून ‘वुमन हू वर्क’ असे एक कॅम्पेन इवांका ट्रम्प चालवत आहे. याच थीमवर तिने २०१७ मध्ये एक पुस्तक देखील लिहिले आहे. तिने यामध्ये मी एक इस्टेट डेव्हलपर असून आंत्रप्रेन्योर असल्याच म्हटले. जगभरात मी आयकॉनिक प्रॉपर्टी बिल्ड करत असून असा बिझनेस वाढवत आहे, जो इतर महिलांना प्रोत्साहन देत आहे.

Leave a Comment