बार्बी डॉलसारखी मुलगी दिसत असल्याने घराबाहेर पडू देत नाहीत आईवडील

Angelica-Kenova
रशियामधील २६ वर्षीय एन्जेलिका केनोव्हा ही मॉडेल एवढी सुंदर आहे की, घरातच तिला कैदेत ठेवावे लागत आहे. होय, खरी परिस्थिती आहे. बार्बी डॉलसारखी एन्जेलिका दिसत असल्याने तिला तिचे आईवडील घराबाहेर निघू देत नाहीत. ती एवढी सुंदर आहे की, लोक तिला एकटक पाहत राहतात.

(व्हिडिओ सौजन्य – InformOverload)
याबाबत एन्जेलिका सांगते की, मला कैदेत ठेवले जाते, असे लोकांना वाटते. पण हे म्हणणे चुकीचे आहे. माझी माझे आईबाबा खूप जास्त काळजी घेतात. मला कुठेच ते एकटीने जाऊ देत नाहीत. मला बॉयफ्रेंड बनवण्याचीही परमिशन नाही. बार्बी डॉलसारखीच मी घरात राहत असल्याने मला बाहेरच्या जगाचा अनुभव नाही, म्हणून माझ्या पालकांची काळजी योग्यच आहे.
Angelica-Kenova1
पुढे एन्जेलिका म्हणते की, लोक तिची बॉडी पाहून म्हणतात की, तू प्लास्टिक सर्जरी केली आहेस, पण हे खरे नाही. मी आजपर्यंत एकदाही सर्जरी केलेली नाही. एन्जेलिका २६ वर्षांची झाली आहे, पण तिचे कपडे आजही तिची आईच खरेदी करते. त्यांनी सांगितले की, माझे सर्व कपडे बार्बीसारखे आहेत.

Leave a Comment