कलिंगडाप्रमाणे कलिंगडाच्या बियादेखील आरोग्यास गुणकारी

watermelon
उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगड हे आवर्जून खाल्ले जाणरे फळ आहे. या फळामध्ये पाण्याची आणि फायबरची मात्रा भरपूर असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ खाण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात. पण कलिंगड खाताना कलिंगडाच्या बिया मात्र आपण काढून टाकत असतो. वास्तविक कलिंगडाच्या गराइतक्याच कलिंगडाच्या बिया देखील आपल्या आरोग्याला अतिशय लाभदायक आहेत. कलिंगडाच्या बियांच्या सेवनाने हृदयाचे कार्य सामान्य राहते, तसेच रक्तदाबही नियंत्रित राहतो. या बियांचे सेवन केसांच्या आरोग्याकरिता ही उत्तम आहे. ज्यांचे केस जास्त गळतात त्यांनी कलिंगडाच्या बियांचे सेवन केल्यास त्यांच्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे केसांची मुळे बळकट होतात आणि केसगळती कमी होते.
watermelon1
कलिंगडाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असल्याने यांच्या सेवनाने त्वचेचे आरोग्य चांगले राहून त्वचा नितळ बनण्यास मदत होते. या बियांच्या सेवनाने पचनास सहायक अशी पोटातील एन्झाईम्स सक्रीय होत असल्याने आपण खाल्लेया अन्नातील पोषक तत्वे शरीरामध्ये अधिक प्रभावीरित्या अवशोषित होतात. एक औंस कलिंगडाच्या बियांमध्ये १५८ कॅलरीज असून ०.२९ मिलीग्राम लोहही यामध्ये असते. कलिंगडाच्या बियांचे सेवन निरनिराळ्या प्रकारे करता येऊ शकते. या बिया कलिंगडातून काढून घेऊन वाळवून खाल्ल्या जाऊ शकतात, किंवा बिया वाळवून त्यामध्ये थोडेसे मीठ घालून तव्यावर कोरड्या भाजून घेऊन खाल्ल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे या बियांना मोड आणूनही या बियांचे सेवन केले जाऊ शकते. त्यामुळे आता कलिंगड खाताना त्याच्या बिया टाकून न देता आपल्या आहारामध्ये अवश्य समाविष्ट कराव्यात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment