या मिरचीचा प्रतिकिलो दर वाचूनच उडतील तुमचे फ्युज


आपल्या दैनंदिन खाण्यात मिरची ही एक महत्वाचा घटक आहे. जे आपण खातो त्यातत मिरची ही ९५ टक्के गोष्टींमध्ये असतेच. मिरची म्हटले की, सर्वांना पटकन तिखट चव आठवते. आज सहज आणि स्वस्त बाजारात हिरवी मिरची मिळते. लाल मिरची बाबतही तसेच सांगता येईल. पण एक अशीही मिरचीची जात आहे, जिची किंमत ऎकून तुमचे फ्युज उडतील एक अशी मिरची आहे, जी जास्त तिखट नाही. पण तिची किंमत लाखांमध्ये तिच्या चवीमुळे मोजली जाते.

या मिरचीला चिल्टेपीन असे म्हटले जाते. तसेच ही मिरची मदर ऑफ चिलीज या नावानेही ओळखली जाते. मटारच्या दाण्यांसारखी दिसणाऱ्या या मिरचीची किंमत प्रतिकिलो २४ लाख रुपये ऐवढी आहे. साल्सा आणि सॉससारखा याचा स्वाद आणि तिखटपणा असतो. या मिरचीची पूड अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते.

केवळ पेरु देशात या मिरचीचे उत्पादन होत असल्यामुळेच याची किंमत अधिक आहे. तसेच याच्या बियाही ऑनलाईन खरेदी करण्यास अडचण येते. तसेच या बिया ऑनलाइन उपलब्ध असल्यास त्यांची किंमतही लाखोंच्या घरात असते. या मिरचीला सध्या जगभरातील बाजारात मोठी मागणी असल्यामुळेच तिचे भावही गगनाला भिडले आहेत. सॉस, चिली सॉसला फास्ट फूडच्या या जमान्यात मोठी मागणी वाढली आहे. या मिरचीचा अंश यातही असतो.

Leave a Comment