अशी झाली होती स्वातंत्र भारताची पहिली निवडणूक

india
पुढील महिन्यापासून सात टप्प्यात होणाऱ्या 17 व्या लोकसभेच्या निवडणुकील सुरुवात होणार आहे. पण आम्ही आज तुम्हाला स्वातंत्र झाल्यानंतर आपल्या देशात पहिली निवडणूक कशी पार पडली ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया देशात कशी पार पडली होती पहिली लोकसभा निवडणूक…
india1
पंडित जवाहरलाल नेहरु यांची स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, तर डॉ. राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. पण देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1952मध्ये पार पडल्या होत्या. 25 ऑक्टोबर 1951 या दिवशी लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची सुरुवात झाली होती. पण 21 फेब्रुवारी 1951 रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा संपला.
india2
तब्बल 68 टप्प्यांमध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. याचा अर्थ देशाच्या वेगवेगळ्या भागात 68 दिवस मतदान झाले होते. हिमाचल प्रदेश मध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. पहिल्यांदा मतदान करण्याचा मान तेथील चिनी आणि पांगी या मतदारसंघाला मिळाला. देशातील शेवटच्या टप्प्याचे मतदान सगळ्यात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशात पार पडले.
india3
17व्या लोकसभेसाठी या वर्षी मतदान होत आहे. 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यांत मतदान होणार आहे आणि 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 1951 साली भारतात पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही पद्धतीने सरकार स्थापन करण्यासाठी 1951 साली आतासारखे सोशल मीडिया, टीव्ही किंवा जाहिरातींचा सुळसुळाटही नव्हता. ईव्हीएमसारखे तंत्रज्ञानही त्याकाळात नसल्यामुळे प्रचारसभा, वृत्तपत्र, फलक, पत्रक, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार होत असे.
india4
पहिली लोकसभा निवडणूक 1951 साली पार पडली. देशातील 54 राजकीय पक्ष त्या निवडणुकीत एकूण सहभागी झाले होते. देशभरात 1 हजार 874 उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. त्या काळात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट अर्थातच नव्हते. बॅलेट पेपरचा वापर 1951-52साली करण्यात आला होता. मतपत्रिका व मतपेटीत टाकण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर वेगवेगळे बॉक्स ठेवण्य़ात आले होते. मतदाराला कोणत्याही बॉक्समध्ये मत टाकण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते.
india5
पुन्हा बॅलेट पेपरचा वापर 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत करण्यात यावा अशी मागणी विरोधक, मतदारांकडून केली जाते आहे. विरोधकांकडून ईव्हीएममध्ये घोळ असल्याची होणारी टीका आणि ईव्हीएमचा होणारा घोळ यामुळे पुन्हा एकदा व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी विरोधक करत आहेत.

Leave a Comment