पिझ्झा बॉयने थांबवली संजू सॅमसनची फलंदाजी

sanju-samson
हैदराबाद : शुक्रवारी राजस्थान आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेला सामना काही वेळासाठी थांबवण्यात आला. पण त्यामागे अजब कारण असल्याचे समोर आले आहे. सामना एका पिझ्झा डिलिवरी बॉयमुळे थांबवण्यात आला होता. पिझ्झा डिलिवर करण्यासाठी तो स्टेडियममध्ये आला होता.

राजस्थानचे संजू सॅमसन आणि अजिंक्य रहाणे सामन्याच्या 12 व्या षटकात फलंदाजी करत होते. विजय शंकर पाचवा चेंडू टाकत असताना संजू सॅमसन क्रिजवरून बाजूला झाला. त्यावेळी स्टेडियममध्ये एक पिझ्झा डिलिव्हरी बॉय आला होतो आणि स्टॅंडमध्ये डोळ्यासमोर आल्याने संजू बाजूला झाला होता. तो निघून गेल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला.

सॅमसनच्या खेळावर सामना मधेच थांबल्याने कोणताही परिणाम झाला नाही. सॅमसनने त्यानंतर वेगवान शतकी खेळी केली. यावेळी समालोचन करणाऱ्या मायकल क्लार्कने म्हटले की, ते आशा करत आहेत की पिझ्झा त्यांच्यासाठी येत आहे. राजस्थानला सॅमसनच्या शतकानंतरही विजय मिळवता आला नाही. हैदराबादकडून वॉर्नरने 37 चेंडूत 69 धावांची वादळी खेळी केली. यात त्याने 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. वॉर्नरच्या वादळापुढे सॅमसनच्या शतकाचा टिकाव लागला नाही आणि त्याचे शतक वाया गेले. 2 गड्यांच्या मोबदल्यात राजस्थानने 198 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या सनरायझर्सने वॉर्नरच्या खेळीच्या जोरावर 19 षटकांतच हे आव्हान पार केले.

Leave a Comment