घटस्फोट घेण्याच्या तयारीत प्रियंका आणि निक?

priyanka-chopra
मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्याच्या 1 तारखेला बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा गायक निक जोनास याच्यासोबत दोन वेळा विवाहबद्ध झाली होती. त्यानंतर त्यांच्या सुखी संसाराचे, पिकनिकचे फोटो कायम सोशल मीडियात व्हायरल होत होते. पण आता त्यातच अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनास लग्नाच्या अवघ्या चार महिन्यातच आपला संसार मोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भातील वृत्त एका इंग्रजी संकेतस्थळाने दिले आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, घाईगडबडीत प्रियंका आणि निकने लग्न केले आणि त्यांच्यात आता वाद होऊ लागले असल्यामुळे लवकरच हे दोघे घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त आहे.

निक जोनास आणि प्रियंकाने एकमेकांना फार वेळ न देता, जाणून न घेता गडबडीत लग्न केले आणि हे दोघे प्रत्येक गोष्टीवर भांडत असतात. प्रियंका आणि निक कामापासून पार्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीवरुन भांडतात. घाईत दोघांनी मोठा निर्णय घेतला आणि आता त्याचीच किंमत मोजत आहेत. त्यांचे लग्न धोक्यात आहे, असे OK या संकेतस्थळाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

या संकेत स्थळाच्या वृत्तानुसार, प्रियंका अतिशय कूल असल्याचे निकला आधी वाटत होते. पण लग्नानंतर निकला प्रियंकाचा कंट्रोल करणारा स्वभाव लक्षात आला. प्रियंकाला रागही लवकर येतो आणि लग्नाच्या सेलिब्रेशनपर्यंत निकला याबाबत माहिती नव्हती. दरम्यान, प्रियंका चोप्राच्या टीमने याबाबत घटस्फोटाचे वृत्त पूर्णत: चुकीचे आणि खोटे असल्याचे सांगितले. मात्र प्रियंकाकडून अधिकृत वक्तव्य केव्हा जारी होणार हे अद्याप सांगितलेले नाही.

Leave a Comment