महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नव्या इनिंगला शुभेच्छा

urmila-matondkar
मुंबई – रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर मुंबई मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उर्मिला यांच्यासमोर भाजपच्या गोपाळ शेट्टी यांचे खडतर आव्हान आहे. पण मराठीविरुद्ध अमराठी अशीच उत्तर मुंबईमधील ही लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नव्या इनिंगला शुभेच्छा दिल्या आहेत.

तू स्वतःतील अंगभूत अभिनयगुणांच्या जोरावर एक अभिनेत्री म्हणून स्वतःचा स्वतंत्र ठसा बॉलीवूडवर उमटवला. तुझ्या वाट्याला अनेक उत्तमोत्तम चित्रपट आले आणि तू मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले. काँग्रेसने आज उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून तुझे नाव जाहीर केले आहे. राजकारणात सक्रिय होण्याचा हा निर्णय तू निश्चितच संपूर्ण विचारांती घेतला असशील. तुझ्यासारखे एक संवेदनशील व्यक्तिमत्व या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात आल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. तुझ्यामुळे महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना-समस्यांना आवाज फोडण्यासाठी मदत होईल, याची खात्री आहे. तुझ्या या नव्या इनिंगला ‘मनसे’ शुभेच्छा!’ अशाप्रकारे मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment