भगोड्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळला

nirav-modi
लंडन : देशातील पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला लंडन कोर्टाने मोठा दणका दिला आहे. नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे. भारतीय तपास यंत्रणांसाठी हे मोठे यश मानलं जातं आहे.

या प्रकरणातील एका साक्षीदाराला धमकी देण्यात आल्याची बाब कोर्टात भारताची बाजू मांडणारे टॉबी कॅडमन यांनी मांडली. तसेच भारतीय तपास यंत्रणांना तो सहकार्य करत नाही. त्याला जामीन मिळाल्यानंतर सगळ्यात आधी तो देश सोडू शकतो. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करु नये अशी मागणी केली.

दरम्यान, सुनावणीपूर्वी नीरव मोदीच्या वकिलाने सांगितले की, प्रभावीपणे याचिका दाखल करण्याचा प्रयत्न करु. पण, यात त्यांना यश आले नाही. लंडनमध्ये नीरव मोदीला अटक झाल्यानंतर यापूर्वी जिल्हा न्यायाधीश मेरी मॅलोनच्या कोर्टात पहिल्यांदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. यावेळी भारताची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टाला सांगितले होते की, नीरव मोदी सुमारे दोन अब्ज डॉलरच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी भारताला हवा आहे. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्याला कोर्टाने दणका दिला आहे.

Leave a Comment