रात्रीस खेळ चालेमधील सरिताचा हा अवतार तुम्ही पाहिला आहे का?

prajakta-wadye
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या मालिकेत कोणतेही प्रतिष्ठीत कलाकार नसतानाही या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यात अण्णा नाईक, शेवंता यांच्या पाठोपाठ ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेतील सरिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता वाडये अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेत साधीभोळी म्हणून वावरणाऱ्या प्राजक्ताचा हा अवतार पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
prajakta-wadye1
प्राजक्ताने मालिकेतील सरिताच्या भूमिकेसाठी स्वत:चा मेकओव्हर केला आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता बऱ्यापैकी सक्रीय असून तिने काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. मालिकेत नेहमीच पारंपारिक पेहरावात दिसणाऱ्या सरिताचे हे फोटो पाहून ही तीच आहे का असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. प्राजक्ताला खऱ्या आयुष्यात भारतीय कपड्यांसोबत पाश्चिमात्य कपडेही परिधान करायला आवडतात.
prajakta-wadye2
प्राजक्ताची ‘रात्रीस खेळ चाले २’ ही दुसरी मालिका असून तिने याआधी झी युवावरील ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकेत भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे काही नाटकांमध्ये देखील तिने काम केले आहे. दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या ‘नदी वाहते’ या चित्रपटातही प्राजक्ताने भूमिका साकारली आहे.

Leave a Comment