पप्पांनी हा निर्णय खूप पूर्वीच घ्यायला हवा होता – सोनाक्षी सिन्हा

shatrughan-sinha
नवी दिल्ली – भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये सहभागी होण्यावर त्यांची मुलगी अर्थात अभिनेत्री सोनीक्षी सिन्हाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय वडिलांनी खूप पूर्वीच घ्यायला हवा होता, असे सोनाक्षीने म्हटले आहे. जो सन्मान माझ्या वडिलांना मिळायला हवा होता. भाजपमध्ये तो मिळाला नसल्याचे तिने म्हटले आहे.

त्यांच्या पंसतीचा हा निर्णय असून मला वाटते तुम्ही जर कुठे आनंदी नसाल तर त्यात तुम्हाला बदल करावा लागतो आणि तेच त्यांनी केले आहे. मला आशा आहे की, वडिल काँग्रेसशी जोडले गेल्यानंतर आणखी चांगले काम करतील आणि ते स्वत:ला कधीच उपेक्षित समजणार नाहीत. पक्षाच्या सुरूवातीपासून माझे वडील सदस्य आहेत आणि मोठा सन्मान त्यांनी मिळवला आहे. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. पण तो सन्मान आता त्यांना मिळत नाही, त्यांचा ज्यावर हक्क आहे. मला वाटते हा निर्णय घेण्यास त्यांनी विलंब केला. त्यांनी फार पूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता.

Leave a Comment