कंगना राणावतला पहलाज निहलानींची तंबी

kangana-ranawat
आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत ही नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने निर्माते-दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला. पहलाज निहलानी यांनी एका फोटोशूटसाठी मला पारदर्शक गाऊन घालायला दिला होता. त्याचबरोबर अंतर्वस्त्र परिधान न करता फक्त पारदर्शक गाऊनवर त्यांनी मला फोटोशूट करायला सांगितल्याचे कंगना म्हणाली होती. कंगनाच्या आरोपांना आता पहलाज निहलानी यांनी देखील उत्तर दिले आहे. कंगनाने माझ्याशी पंगा घेऊ नये, कारण माझ्याजवळ देखील अशा गोष्टी ज्यामुळे तुझी वाट लागू शकते, अशी तंबी दिली आहे.

पहलाज निहलानींबाबत एका मुलाखतीत कंगनाने धक्कादायक खुलासा केला. मला पहलाज निहलानी यांनी एका चित्रपटाची ऑफर दिली होती. त्या चित्रपटाचे ‘आय लव्ह यू बॉय’ असे नाव असून त्यासाठी फोटोशूट होणार होते. मला त्यांनी फोटोशूटसाठी पारदर्शक गाऊन घालायला दिला होता. त्याचबरोबर त्यांनी मला अंतर्वस्त्र परिधान न करता फक्त पारदर्शक गाऊनवर फोटोशूट करायला सांगितले होते. मी या चित्रपटात एका मुलीची भूमिका साकारणार होती, तिच्या बॉसविषयी जिच्या मनात लैंगिक भावना आहेत. एक सॉफ्ट पॉर्न ती भूमिका होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मी हे सगळे ऐकूनच काम करू शकत नसल्याचे सांगितले आणि तिथून पळ काढला.

पहलाज यांनी या आरोपांनंतर कंगनाला तंबी दिली आहे. माझ्याशी तिने पंगा घेऊ नये, नाहीतर माझ्याकडे तिच्याविषयी सांगायला बऱ्याच गोष्टी आहेत. मी या फोटोशूटसाठी दीड कोटी खर्च केले होते. महेश भट्ट यांच्या गँगस्टर चित्रपटात तिला काम करायचे होते म्हणून तिने चित्रपटाला नकार दिला. या चित्रपटाला कंगनाने सॉफ्ट पॉर्न म्हटले आहे. पण मी अया चित्रपटासाठी मिताभ बच्चन यांनादेखील विचारले होते.

Leave a Comment