आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार मराठमोळा संतोष जुवेकर

santosh-juvekar
अभिनेता संतोष जुवेकर मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहचला आहे. पण आता संतोष पहिल्यांदाच एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात भूमिका साकारणार आहे. एका जर्मन चित्रपटात संतोष झळकणार असून या चित्रपटाचे ‘डिसोनन्स’ असे नाव आहे. संतोष या चित्रपटामध्ये एका लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. ‘डिसोनन्स’ ही सायन्स फिक्शन फिल्म असून तो चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.

संतोषने या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी गेले काही महिने आपल्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. त्याने योग्य आहार आणि जीम ट्रेनिंगव्दारे लष्कर अधिकाऱ्यासारखा फिटनेस मेन्टेन केला. त्याचप्रमाणे त्यांच्या फिजिकल अपिअरन्स आणि वागण्या-बोलण्याच्या पध्दतींचाही बारकाईने अभ्यास केला. हा चित्रपट जर्मन असल्यामुळे संतोष सध्या एका शिक्षकाकडून जर्मन भाषेची उजळणी करत आहे.

Leave a Comment