हॉलिवूडची गर्भश्रीमंत अभिनेत्रीला उतरती कळा

Kendall-Jenner
असे म्हणतात ना, आपल्या नशीबात जे वाढून ठेवले आहे ते भोग आपल्याला कधी ना कधी भोगावेच लागतात. पण असेच काहीसे हॉलीवूडमधील गर्भश्रीमंत अभिनेत्रीसोबत घडले आहे. ती अभिनेत्री म्हणजे केंडल जेनर असून एकेकाळी तिने अनेकांचे अपमान केले होते, त्याच बरोबर तिने केलेला पैशांचा माज आता तिच्यावरच उलटला आहे. कारण सध्याच्या घडीला तिचे खाण्यापिण्याचे वांदे झालेले असतानाच तिच्या डोक्यावरील छत देखील आता गेले आहे. प्रियकर बेन सिमन्ससोबत गेली दोन वर्षे केंडल रहात होती. पण त्यांच्या झालेल्या वादामुळे त्यांचा संसार मोडला आणि येथूनच तिची उतरती कळा सुरु झाली.
Kendall-Jenner1
बेनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर केंडल लॉस एन्जेलिसमधील उच्चभ्रू भगात एका भाडय़ाच्या बंगल्यात राहू लागली. सुरुवातीचा काळ तिचा बरा गेला; पण आलिशान जीवनशैली जगण्याचा तिला लागलेला चस्का आर्थिक परिस्थितीमुळे कमी होऊ लागला. त्याचबरोबर तिला मिळणारी कामे देखील बंद झाल्यामुळे तिची आर्थिक कोंडी होऊ लागली आहे. तसेच तिच्याकडे घरभाडे देण्याचे देखील पैसे शिल्लक नसल्यामुळे घरमालकाने देखील तिला घराबाहेर काढले आहे.
Kendall-Jenner2
सोशल मीडियाच्या माध्यमातून हॉट व ग्लॅमरस अवतारात बागडणाऱ्या केंडल जेनरच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. केंडलने बोल्ड छायाचित्रे व वादग्रस्त विधानांच्या जोरावर मोठा चाहता वर्ग गोळा केला. परिणामी तथाकथित लोकप्रियतेच्या जोरावर सर्वात प्रथम तिला ‘अमेरिकन चिअरलीडर’ नियतकालिकाच्या कव्हर पेजवर झळकण्याची संधी मिळाल्यानंतर सामान्य जीवन व्यतीत करणाऱ्या केंडलचे आयुष्य एकाएकी बदलले.
Kendall-Jenner3
‘अमेरिकन चिअरलीडर’मधील तिची छायाचित्रे एवढी गाजली की सुपरस्टार जस्टिन बीबरदेखील तिच्या प्रेमात पडला. तिने अनेक मोठय़ा ब्रँडच्या जाहिराती त्यानंतर केल्या. अभिनयाचा सौंदर्याला शाप असतो असे आल्फ्रेड हिचकॉकने म्हटले होते. या वाक्यात केंडल जेनर जशीच्या तशी बसते. परंतु अभिनयातील ‘अ’ देखील येत नसताना केवळ प्रसिद्धीच्या जोरावर ती मालिकांमध्ये झळकू लागली. कालपर्यंत कोणाच्या ध्यानीमनी नसलेली केंडल स्टाइल आयकॉन बनली. तिच्या यशाचा आलेख हळूहळू वरती जात होता. परंतु तेच यश नंतर तिच्या डोक्यात गेले. आणि तिचा उद्धटपणा वाढला.
Kendall-Jenner4
ती येता-जाता पत्रकार, दिग्दर्शक, चाहते सर्वाचाच अपमान करू लागली. तिने पाच वर्षांच्या कारकीर्दीत अनेक प्रियकर बदलले. तिने या सर्वामुळे कमावलेले नाव गमवण्यास सुरुवात केली. तिच्या उद्दामपणाचा उच्चतम बिंदू म्हणजे आपला आर्थिक कर्ताधर्ता बेन सिमन्सबरोबर तिने केलेला ब्रेकअप होय.

Leave a Comment