या महिलेने चक्क नवऱ्याच्या पोसपोर्टलाच बनवली फोन डिरेक्टरी

passport
आपल्या देशातील नागरिक कोणतीही गोष्ट वाया जाऊ नये याबाबतीत खुपच सजग असतात. त्यांचा कल नेहमीच अन्नापासून ते कागदाच्या तुकडयापर्यंत प्रत्येक गोष्ट उपयोगात आणण्याकडे असतो. आता काही दिवसातच परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे. त्यातच विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या वहीत उरलेल्या कोऱ्यापानांचा सदुपयोग करताना दिसतील पण त्यांचे पालक मात्र पानांचा उपयोग फोन नंबर लिहिण्यासाठी करतात.
passport1
पण केरळमधील एका महिलेने याबाबतीच चक्क हद्दच केली आहे. तिने आपल्या नवऱ्याच्या पासपोर्टला चक्क फोनची डिरेक्टरीच बनवून टाकले आहे. तिने या पासपोर्टवरील कोऱ्या पानांवर वेगवेगळे फोन नंबर लिहून ठेवले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
passport2
पासपोर्टला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. कारण आपली परदेशवारी ही पासपोर्टवरच निर्भर असते. परदेशात सहलीसाठी अथवा नोकरीसाठी जाण्याकरिता पासपोर्ट हा महत्वाचा असतो. तुम्ही अन्यथा देशाबाहेर जाऊ शकत नाही. पण या महिलेने त्याच पासपोर्टला फोन डिरेक्टरी बनवून टाकले आहे. या पासपोर्टच्या शेवटच्या काही पानावर किराणा मालाची यादी आणि किती बिल झालं तो हिशोब सुद्धा लिहून ठेवला आहे.

Leave a Comment