मसूद अजहरला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचा प्रस्ताव

masood-azhar
वॉशिंग्टन – अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात ‘जैश-ए-मोहंमद’चा म्होरक्या मसूद अजहरला ब्लॅक लिस्टेड करण्यासाठीचा प्रस्ताव मांडला आहे. फ्रान्स आणि ब्रिटन या दोन्ही देशांनीही अमेरिकेच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. गेल्याच महिन्यात चीनने मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यास नकाराधिकाराचा वापर केला होता.

‘जैश’ने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मसूदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून भारताचे प्रयत्न सुरू आहेत. भारताने यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता. पण नकाराधिकाराचा वापर करत चीनने जागतिक दहशतवादी घोषित करण्यास नकार दर्शविला होता. अमेरिकेच्या प्रस्तावाला आता फ्रान्स आणि ब्रिटनने मंजुरी दिली आहे. पुलवामा हल्ल्याचा निषेध करत मसूदला काळ्या यादीत टाकण्याची अमेरिकेने केली आहे. या यादीमध्ये अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट (आयसिस)सारख्या संघटनांचा समावेश आहे.

Leave a Comment