पेटीएमच्या संस्थापकाला ब्लॅकमेल करणारी ‘ती’ पुन्हा कामावर

sonia-dhawan
पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना ब्लॅकमेल करण्याचे एक प्रकरण काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. यात सोनिया धवन हिने विजय शेखर शर्मा यांना त्यांची खासगी माहिती उघड करण्याची धमकी देत 20 कोटी रूपयांची मागणी केली होती. त्याप्रकरणी सोनिया धवनला पोलिसांनी अटक देखील केली होती. नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली होती. पण आता तिच सोनिया धवन आता पुन्हा कामावर हजर झाली आहे.

याबाबत सोनियाने सांगते की, काय झाले ते मला माहिती नाही. पण विजय शेखर यांनी याबद्दल उत्तर द्यावे. यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या समोर आल्या नाहीत. डिजीटल ट्रान्झॅक्शनमधील मोठी कंपनी असलेल्या ‘पेटीएम’मध्ये ब्लॅकमेलिंगचे एक धक्कादायक कारस्थान समोर आले होते. गेल्या सात वर्षांपासून सोनिया धवन ही महिला पेटीएममध्ये काम करत होती. 7 लाखांपासून 85 लाखांपर्यंत सात वर्षांत तिचा पगार पोहोचला. पेटीएमचे संस्थापक असणाऱ्या विजय शेखर शर्मा यांची सेक्रेटरी म्हणून सोनिया काम पाहत होती.

मित्र देवेंद्र कुमार आणि पती रूपक जैन यांच्या मदतीने पेटीएमच्या संस्थापकांना डेटा लीक करण्याची धमकी दिल्याचा, तसेच त्यांच्याकडे 20 कोटी रुपये मागितल्याचा सोनिया धवनवर आरोप आहे. सोनियासह तिचा मित्र देवेंद्र आणि रुपक या तिघांनाही या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. प्राथमिक तपासानुसार, विजय यांना एक व्यक्ती फोन करून डेटा लीकची धमकी देत 20 कोटींची मागणी करत होता. यादरम्यान, विजय शेखर यांना सोनिया ही सतत सांगत असे की, त्या व्यक्तीला 20 कोटी रूपये देऊन टाका, नाहीतर तो तुमचा डेटा लीक करेल. पण सोनिया धवननेच हा डेटा लीक केला होता आणि तिनेच दुसऱ्या व्यक्तीद्वारे फोन करून पेटीएमच्या संस्थापक ब्लॅकमेल केल्याचे उघड झाले होते.

Leave a Comment