अवघ्या सात दिवसात केसरीची शंभरी

kesari
बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमार आणि शंभर कोटींचा गल्ला हे जाणू काही एक समीकरणच बनले आहे. त्यातच त्याचा रंगपंचमीच्या दिवशी रिलीज झालेला केसरी हा चित्रपट बॉलीवूडमध्ये सर्वात वेगाने 100 कोटींचा गल्ला जमावणार चित्रपट बनला आहे. त्याआधी मागील तीन महिन्यात रिलीज झालेल्या चित्रपटांना 100 कोटींचा गल्ला जमावण्यासाठी सात दिवसांहून अधिक काळ लागला होता.

रंगपंचमीच्या मुहुर्तावर म्हणजेच 21 मार्चला त्याचा केसरी हा चित्रपट रिलीज झाला होता. त्याच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 21 कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली होती. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला लाभला. सारागढीच्या युद्धावर हा चित्रपट आधारलेला आहे. इतिहासात लढलेले सर्वात धाडसी युद्ध अशा शब्दात या युद्धाचे कौतुक केलेले पहायला मिळते. हा चित्रपट भारतातील 3600 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. सात दिवसांत एकूण 100.01 कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.

Leave a Comment