रेल्वे स्थानकावरील खुल्या सरबत विक्रीवर बंदी

juice
मुंबई: हार्बर रेल्वेमार्गावरील कुर्ला स्थानकातील फलाटावर घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत तयार करण्यात येत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने आता त्याबाबत कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार फलाटांवर करण्यात येणाऱ्या खुल्या सरबत विक्रीवर मध्य रेल्वेने अखेर बंदी घातली आहे. त्यामुळे केवळ लिंबू सरबतच नव्हे, तर काला खट्टा, ऑरेंज ज्यूस ही पेये देखील रेल्वे स्थानकांतील स्टॉलमधून हद्दपार होणार आहेत.

सोशल मीडियावर कुर्ला स्थानकावरील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. यामध्ये अगदी स्पष्टपणे लिंबू सरबत तयार करताना होणारा अस्वच्छ पाण्याचा वापर दिसत होता. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून खुल्या सरबत विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानकांतील स्टॉलवर सरबत विक्री करण्यास मध्य रेल्वेने बंदी घातली असली तरी, पश्चिम रेल्वेच्या लोकल स्थानकांवर सरबत किंवा खाद्यपदार्थांबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

Leave a Comment