31 मार्चला सुरु राहणार बँका

RBI
नवी दिल्ली : देशातील सर्व बँका येत्या रविवारी म्हणजेच 31 मार्चला सुरु राहणार आहेत. सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना रविवारी बँक सुरु ठेवण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस 31 मार्चला आहे आणि रविवार याच दिवशी येत असल्यामुळे आरबीआयने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना आपल्या शाखा सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

एक परिपत्रक काढत रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, महिना अखेर तसेच चालू आर्थिक वर्षाचाही शेवटचा दिवस असल्याने सरकारी कामांचे देणे आणि सरकारी पावत्यांची कामे यासाठी 31 मार्च 2019 रोजी सरकारचे सर्व पे अँड अकाऊंट सुरु राहणे गरजेचे आहे. ही कामे रखडू नये यासाठी रविवारीही सरकारी बँक सुरु ठेवण्यात येणार आहेत.

सर्व बँकांना रिझर्व्ह बँकेने विनंती केली आहे की, 30 मार्च 2019 रोजी सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँका संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आणि 31 मार्च 2019 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच परिपत्रकात म्हटले आहे की, RTGS आणि NFFT सह सर्व प्रकारचा इलेक्ट्रॉनिक व्यवहारही 30 आणि 31 मार्च 2019 रोजी जास्त वेळ सुरु राहील. रविवारी सर्वांना साप्ताहिक सुट्टी असल्याने त्याचा फायदा इतरानांही होणार आहे. यामुळे सर्वच सरकारी बँकांच्या शाखा सुरु राहणार आहेत.

Leave a Comment