‘ही’ अभिनेत्री साकारणार बायोपिकमध्ये मायावतींची भूमिका

mayawati
बॉलीवूडमध्ये बायोपिकचे वारे वाहत असून त्यात राजकीय नेते, खेळाडू यांच्यावर आधारित बायोपिक पाहिलेच असतील. पण आता तुमच्या भेटीला आणखी एका राजकीय नेत्याचा बायोपिक येते आहे. त्या आहेत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती. मायावती यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक तुमच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार असून या बायोपिकमध्ये मायावतींच्या भूमिकेत बॉलीवूडची डर्टी गर्ल विद्या बालन झळकणार आहे.

बऱ्याच नावाजलेल्या अभिनेत्रींच्या नावांची मायावतींच्या भूमिकेसाठी चर्चा केल्यानंतर विद्या बालन हिची या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने निवड केली आहे. या भूमिकेसाठी विद्याने देखील होकार दिला असल्याचे वृत्त आहे. सध्या मायावतींबद्दल ती वाचन करत आहे. उत्तर प्रदेशसह देशभरातील त्यांच्या चाहत्यांना मायावतींच्या बायोपिकबाबत उत्सुकता आहे.
vidya-balan
सध्या बॉलीवूडमध्ये राजकीय नेत्यांवर चित्रपट बनवण्याची स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ‘ठाकरे’, मनमोहन सिंह यांच्यावर ‘दी : अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘पीएम नरेंद्र मोदी’, दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि नेते नंदामुरी तारका रामा राव (एटीआर)यांच्यावर ‘एनटीआर’ हे चित्रपट बनवण्यात आले आहेत. त्यात आता मायावतींच्या बायोपिकची भर पडणार आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचादेखील बायोपिक लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment