बॉडीगार्ड शेराच्या मुलाला लाँच करणार भाई सलमान खान

tiger
बॉलीवूड मध्ये अनेक नव्या ताऱ्यांचा मार्ग प्रशस्त करून देण्याबाबत ख्याती असलेला द्बंग भाईजान सलमान खान त्याला गेली २१ वर्षे संरक्षण पुरवीत असलेला बॉडीगार्ड शेरा याच्या मुलाचा गॉडफादर बनला आहे. शेराचा मुलगा टायगरचे बॉलीवूड लाँचिंग करण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे. टायगरला बॉलीवूड मध्ये करिअर करायचे आहे आणि सलमान त्याच्यासाठी योग्य स्क्रिप्ट्स शोधत आहे असे समजते.

गेली २१ वर्षे शेरा सलमानला सुरक्षा पुरवीत आहे. सलमान आणि शेरा यांच्यासोबत शेराचा मुलगा टायगर अनेक कार्यक्रमात दिसला आहे. टायगर २५ वर्षांचा असून त्याचे फिजीक आणि लुक उत्तम आहेत असे सलमान मानतो. सलमानच्या प्रोत्साहनाने त्याने बॉलीवूड डेब्यू करण्यासाठी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. सलमानच्या सुल्तान चित्रपटासाठी त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

टायगरला यापूर्वीच बड्या दक्षिणात्य सुपरस्टार कडून चित्रपटाची ऑफर आली होती. हा सुपरस्टार त्याच्या मुलीचा हिरो म्हणून टायगरला भूमिका देणार होता. पण सलमानने टायगरला अगोदर अभिनय प्रशिक्षण घ्यावे असे सुचविले आणि शेराने टायगर ही भूमिका आत्ता करू शकणार नाही असे सांगून चित्रपट नाकारला होता असेही समजते. शेरा सलमानच्या घराजवळ लहानपणापासून राहतो आणि नंतर तो त्याचा बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे. सलमानच्या सांगण्यावरून त्याने २०१७ साली विझक्राफ्ट ही इव्हेंट कंपनी सुरु केली असून टायगर सिक्युरिटी नावाने आणखी एक कंपनी सुरु केली आहे. ही कंपनी स्टार्सना सुरक्षा पुरविण्याचे काम करते.

शेरा सलमान जेथे जाणार असेल तेथे अगोदरच जाऊन जागेची पाहणी करणे, सुरक्षा लावणे ही कामे जबाबदारीने करतो. अनेकदा गर्दी हटवून रस्ता मोकळा करण्यासाठी तो ५-५ किमी अंतर पायी तोडतो असे समजते.

Leave a Comment