तिरुपती बालाजीची आहेत ही काही गुपिते

balaji
देशातले सर्वात मोठे आणि श्रीमंत देवस्थान म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. गरीब श्रीमंत सर्व या ठिकाणी वेंकटेश्वर दर्शनासाठी गर्दी करत असतात. वर्षभर भाविक येथे दर्शनासाठी येतात. या ठिकाणी वेंकटेश्वर बालाजी पत्नी पद्मावती सह निवास करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळेच त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि कृपा व्हावी म्हणून येथे लाखोनी भाविक येत असतात. सच्च्या दिलाने केलेली प्रार्थना बालाजी स्वीकारतो आणि भाविकाची इच्छापूर्ती करतो असा समज आहे.

या मंदिराची काही गुपिते आहेत. येथे दररोज हजारोच्या संख्येने भाविक येतात आणि त्यातील बरेचजण केस दान करतात. या मागे असे कारण सांगतात कि मंदिरात जी मूर्ती आहे त्यावर खरे केस आहेत. या केसात कधीच गुंता होत नाही आणि ते स्पर्शाला अतिशय मऊ आहेत. यावरूनच येथे बालाजी वास्तव्य करतो असे सांगितले जाते. असेही सांगतात की या मूर्तीला कान लावला तर समुद्राची गाज म्हणजे लाटांचे आवाज ऐकू येतात. यामुळे बालाजीची मूर्ती नेहमी ओलसर असते.

tuddi
तिरुपतीचे दर्शन घेताना गाभाऱ्यात मूर्ती मधोमध असल्याचे दिसते पण मुख्य द्वारातून दर्शन घेताना ती उजवीकडे दिसते. या मुख्य दाराच्या उजवीकडे एक छडी ठेवलेली आहे. असे सांगितले जाते कि या छडीने बालाजीला चोप दिला गेला होता तेव्हा त्याच्या हनुवटीला जखम झाली. हा घाव भरावा म्हणून आजही दर शुक्रवारी तेथे चंदनाचा लेप लावला जातो. येथेच एक नंदादीप असून तो अखंड तेवता आहे. या मूर्तीवर एक खास प्रकारचा कापूर लावला जातो. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हा कापूर कोणत्याही दगडाला लावला तरी दगडाचे टवके निघतात. मात्र मूर्तीचा एकही टवका निघालेला नाही.

बालाजीच्या हृदयात लक्ष्मी माता विराजमान आहे. गुरुवारी जेव्हा बालाजीचा शृंगार उतरवून त्याला स्नान घालून चंदनाचा लेप लावतात तेव्हा लक्ष्मीचे दर्शन होते. यामुळे बालाजीचा पोशाख करताना खाली धोतर तर वर साडी नेसविली जाते. तिरुपतीपासून २३ किमी अंतरावर एक गाव आहे तेथे बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. या गावातून बालाजीच्या पूजेसाठी लागणारी फुले, फळे, दुध, दही, तूप आणले जाते. या गावातील महिला शिवलेला कपडा वापरत नाहीत.

बालाजीची मूर्ती विशेष पत्थरापासून घडविली गेली आहे. मंदिरातील वातावरण कितीही थंड ठेवले तरी उन्हाळा सुरु झाला कि मूर्तीवर घामाचे थेंब दिसतात आणि मूर्तीची पाठ ओली होते असेही सांगितले जाते.

Leave a Comment